ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची द्वैवार्षिक निवडणूक ३ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणूक आयोगाने याची घोषणा केली. या निवडणुकीची सुचना १० जानेवारीला प्रसिध्द होईल तर १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ जानेवारीस उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि २० जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ फेब्रुवारीस सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होऊन ६ फेब्रुवारीस मत मोजणी होईल असे भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. निवडणूक जाहीर झाल्याने कोकण विभागात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.