कणकवली्च्या ’गावय’ या नाटकाला प्रथम तर पनवेलच्या ’ओय लेले’ ला द्वितीय, रत्नागिरीचे ’अपूर्णांक’ने पटकावला तृतीय क्रमांक

ठाणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या कामगार कल्याण केंद्र, कणकवलीच्या ‘गावय’ या नाटकातील कलाकारांचा गौरव करताना मान्यवर.
मुंबई :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्राथमिक फेरीचा बक्षीस समारंभ कन्नमवार नगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडला. ठाणे विभागातून ही स्पर्धा घेण्यात आली.त्यात कामगार कल्याण केंद्र कणकवलीच्या ‘गावय’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. पनवेल केंद्राच्या ‘ओय लेले’ ने द्वितीय तर कल कामगार वसाहत, रत्नागिरीच्या ‘अपुर्णाक’ला तृतीय क्रमांक मिळाला. शुक्रवारी (ता.१३ जानेवारी) पारितोषिक वितरण समारंभ झाला. महोत्सवाचे हे ६४ वे वर्ष आहे.
मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्राध्यापक डॉ.प्रकाश खांडगे, सिने निर्माता व दिग्दर्शक संतोष मांजरेकर, व्हिक्टर प्रोजेक्ट इंडीया लि.चे संचालक दिपक बागव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित, विशेष उपस्थिती म्हणून मंडळाचे कल्याण आयुक्त अ.द.काकतकर, विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे आदी उपस्थित होते. सुत्र संचलन प्रशांत कनवाळू व गजेंद्र आहेर यांनी केले. कामगार कल्याण अधिकारी नितीन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
५०० किलोमिटर अंतरावरुन येऊन संघ स्पर्धेत सहभागी होत असतो. त्यामुळे तुटपुंज्या रकमेत नाटक सादर करणे कलाकारांना अवघड जात असल्याने नाटय महोत्सवातील परिक्षकांचे मानधन , बक्षीसांच्या रकमा तसेच सादरीकरण खर्च वाढवू, असे आश्वासन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी दिले. सरकारी नाटयस्पर्धा अशा भव्यदिव्य स्वरुपात प्रथमच पहायला मिळाल्या असे गौरवोद्गार संतोष मांजरेकर यांनी काढले. “कामगार रंगभुमीने जसा कामगार घडवला तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत कामगार कलावंतांचे योगदान आहे आणि म्हणूनच कामगार रंगभूमी जागतिक पातळीवर पोहोचायला हवी’ असे डॉ.प्रकाश खांडगे म्हणाले.
एकूण २० नाट्य संघांनी सहभाग घेत दर्जेदार नाटके महोत्सवात सादर केली. नाटकांचे परिक्षण दिप चहांदे, अनंत पेडणेकर व ज्योती निसळ यांनी केले.
सर्वोत्कृष्ट नाट्य प्रयोग
नाटकाच नाव : (प्रथम क्रमांक) ’गावय’ कामगार कल्याण केंद्र,कणकवली,
(द्वितीय क्रमांक) ओय लेले कामगार कल्याण केंद्र,पनवेल
(तृतीय क्रमांक) अपूर्णाक कल कामगार वसाहत,रत्नागिरी
उत्तेजनार्थनाटय प्रयोग
’वापर’-कामगार कल्याण केंद्र-शहाड,
’अर्काईक’- कामगार कल्याण केंद्र,बदलापूर
सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष
किशोर कदम- गावय,
यशोधन मावळणकर- ओय लेले,
निलेश खेडेकर -अर्काईक
सर्वोत्कृष्ट अभिनय महिला
पल्लवी माळवदे – गावय, कणकवली केंद्र
वैदही पटवर्धन – अपूर्णांक – रत्नागिरी केंद्र
अपूर्वा कामत- मुखवटे, मालवण केंद्र
दिग्दर्शन
सुहास वरुणकर -गावय , कणकवली
राजू वेंगुलेकर – ओये लेले – पनवेल
चंद्रकांत कांबळे – अपूर्णांक – रत्नागिरी
उत्तेजनार्थ अभिनय पुरुष
विजय चव्हाण, गावय, का.क.केंद्र,कणकवली
डॉ.गुरुराज कुलकणी, लॆडमाफिया, का.क.केंद्र,कुडाळ
विक्रांत जिरांगे, लोककथा ७८, काक.केद्र.पोफळी
तेजस गुरुर्ज, वापर, का.क.केंद्र.शहाड
मितेश आंगणे, आघात, का.क.भवन,विक्रोळी
नंदकुमार भारती, नटीचा काय का.क.केंद्र,रत्नागिरी
नदू तळवडकर, इला अंगावर घेतला खांद्यावर, का.क.केंद्र,खुलेनाट्यगृह
समीर पवार, दंतकथा, टागोरनगर केंद्र
जयवत तारकुड, बीज, रिलायन्स नागोठणे
अमोल ताटे , ट्रप, का.क.केंद्र,पालघर
सर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीत
प्रथम क्रमांक- संजय जोशी, पनवेल केंद्र
द्वितीय क्रमांक- अमर पवार, कणकवली केंद्र
तृतीय क्रमांक-योगेश मांडवकर/नरेंद्र पराडकर, कर्ला कामगार वसाहत, रत्नागिरी
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
प्रथम क्रमांक- सौरभ सेठ , टिळकनगर केंद्र
द्वितीय क्रमांक- सुभाष कदम, कणकवली केंद्र
तृतीय क्रमांक- शाम चव्हाण, राबोडी केंद्र
सर्वोत्कृष्ठ लेखन
प्रकाश पवार, कर्ला कामगार वसाहत, रत्नागिरी