मुंबई : कंपनी सचिवच्या फाऊंडेशन प्रोग्रामसाठी डिसेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत 66.21 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दीपक जैन या परीक्षेत पहिला आला. रश्मीत कौर छाब्रा दुसरी तर प्रीती देशमुख आणि व्ही. आर. शाशंधन सुरेश यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.
सीएस फाऊंडेशन प्रोग्रामची पुढील परीक्षा ३ आणि ४ जून ला घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी www.icsi.edu ला भेट द्यावी.