बॆंकांकडून कार्डांच्या व्यवहारांवर आकारण्यात येणार्या अधिभाराचा निषेध
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : कार्डांद्वारे होणार्या कॆशलेस व्यवहारावर बॆंकां अधिभार आकारणार आहेत, त्याच्या निषेधार्थ रविवार ८ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून देशातील पेट्रोल पंपांवर क्रेडीट किंवा डेबिट कार्ड स्वीकारण्यात येणार नव्हते, परंतु हा निर्णय आता १३ जानेवारीपर्यंत लांबणीवर ढकलण्यात आला आहे. याआधी कार्डांद्वारे व्यवहार बंद करण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला होता.
तेल क्षेत्रातील अधिकार्यांकडून आम्हाला सूचना मिळाली की पेट्रोलियम मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यानंतर क्रेडीट आणि डेबिट कार्डवर काही बॆंकांकडून लावण्यात येणारे अधिभार शुल्क १३ जानेवारीपर्यंत आकारण्यात येणार नाही आहे, त्या नुसार आम्ही नवीन निर्णय घेतल्याचे असोसिएशनने सांगितले.
“९ जानेवारीपासून क्रेडिट कार्डाच्नेवारी या सर्व व्यवहारांवर सरसकट एक टक्का व डेबिट कार्ड व्यवहारांवर ०.२५ ते एक टक्क्यांपर्यंत एमडीआर शुल्क आकारण्याचे बॆकांनी म्हटले आहे,” असे असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले होते. बॆंकानी परस्पर घेतलेल्या निर्णयामुळे डिजिटल व्यवहार बंद ठेवण्यात येतील, असेही ते म्हणाले होते. परंतु आता १३ जानेवारीपर्यंत त्यांनी विरोध न करण्याचे ठरविले आहे.