मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला खेरवाडी सिग्ललजवळ आज दुपारी अपघात झाला. एका खासगी कारने सिग्नल तोडला आणि आदित्य यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आदित्य ठाकरे या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.
मातोश्रीवरून आदित्य हे बीएमडब्ल्यू कारने निघाले होते. अपघातात बीएमडब्ल्यूचे नुकसान झाले. वाहतूक पोलिसांनी कार चालकावर दंडात्मक कारवाई केली आहे.