मुंबई, 25 ऑगस्ट : मालाडमधील पर्यटनात भर पडावी यासाठी विविध पर्यटनस्थळांच्या विकासावर भर दिला जातोय. याचाच एक भाग म्हणून मालाडमधील मार्वे टी जंक्शन येथे बांधण्यात आलेल्या हॅश टॅग मार्वे चौकाचे उद्घाटन मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मंगळवार दि. 25 आॅगस्ट रोजी करण्यात आले.
अस्लम शेख यांच्या स्थानिक विकास निधीतून या चौकाचे बांधकाम करण्यात आले. शेख याप्रसंगी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संपुर्ण मालाडमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी हॅश टॅग मालाड ही संकल्पना राबवली जातेय. या संकल्पनेच्या माध्यमातून चौकांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.