रत्नागिरी, 10 Sept : खवल्या मांजरासह मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आलं आहे. शहरानजीकच्या काजरघाटी धारेवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर व 1 मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये १) रंजीत सुरेंद्र सांवत, वय ३८ वर्षे, झाडगाव नाका, ता.जि.रत्नागिरी २ ) सुनिल अनंत देवरुखकर, वय ३४ वर्षे रा .पोचरी, सोनारवाडी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी ३)ओमकार राजेश लिंगायत , वय -२४ वर्षे रा गुरववाडी, खानु मठ ता. लांजा जि.रत्नागिरी ४ ) दिपक दिनकर इंगळे , वय २४ वर्षे रामुकणगवली पो.वेरळ ता.लांजा, जि.रत्नागिरी ५ ) संदेश रामचंद्र मालगुंडकर, वय ३ ९ वर्षे रा. धामापुर घारेवाडी, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी ६) दिनेश दत्ताराम मोन्डे, वय २९ वर्षे , रा. आडीवरे , कालीकावाडी , ता . राजापूर जि . रत्नागिरी सध्या रा. अक्षता अपार्टमेंट, रुम नंबर १६ , कारवांचीवाडी.रत्नागिरी ७ ) प्रमोद वसंत कांबळे , वय ३ ९ वर्षे रा.कांबळेवाडी. कारवांचीवाडी ता.जि.रत्नागिरी सध्या भाड्याने राहणार झाडगांव, ता.जि.रत्नागिरी ८ ) लक्ष्मण बबन नाडे , वय ४ ९ वर्षे रा. धामणी , ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी होत असल्याची माहिती रत्नागिरीतील शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली होती. या माहितीवरून शहर पोलीस संशयितांवर लक्ष केंद्रित करीत सापळा रचला होता. काजरघाटी येथे काहीजण या तस्करीतील वस्तू घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ग्राहक बनून संपर्क केला होता. या तस्करीसाठी बनावट ग्राहक बनून गेलेल्या पोलिसांनी तस्करीचे ठिकाण यांच्याकडून निश्चित करून घेतले आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. बुधवारी दुपारपासून पोलिसांनी काजरघाटी धारेवर सापळा लावला होता. मोठे ग्राहक मिळाल्याने खवले मांजराची विक्री करण्यासाठी तीन दुचाकीवरुन आठ संशयित आरोपी जिवंत खवले मांजर व एक मांडूळ जातीचा साप घेऊन आले होते. भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी काजर घाटी धारेवर थांबल्या आणि फिल्मी स्टाईल झटापट झाली. जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी घेऊन आलेल्या आठ संशयितांवर पोलिसांनी झडप घातली. या संशयितांनी पोलिसांशी हुज्जत घालत घटनास्थळी झटापट केली. मात्र पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार या तस्करीत मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , डीवायएसपी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. मनोज भोसले , सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री . विजय जाधव , स.पो.फौ , श्री . साळवी , पो.ह. श्री.जाधव, हे कॉ. श्री . चांदणे, पो.ना. श्री . सुर्वे , पो.ना. श्री . घोरपडे.पो.ना . श्री . घोसाळे , पो.ना. श्री . सावंत , पो.ना.श्री. खांचे , पो.ना. श्री . सावंत पो.ना. श्री . जाधव , पो.ना. श्री . नार्वेकर , पो.कॉ. श्री . धनावडे , पो.कॉ. श्री . चाटे यांनी केली आहे.