मुंबई, विशेष प्रतिनिधी:- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्या कन्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.