मुंबई : आजच्या भारतीय तरुणाईला पॉप, ईडीएम आणि हिप-हॉप संगीताची भुरळ पडल्याचे जिओसावन या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या संगीत स्ट्रीमिंग सेवेने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सर्वात जास्त ऐकल्या जाणा-या गाण्यांमध्ये प्रादेशिक भाषेच्या संगीताचे योगदान २०% असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. नेहा कक्कड, अरिजित सिंह आणि तुलसी कुमार हे जिओसावनवरील लोकप्रिय भारतीय कलाकार आहेत, तर अॅलन वॉकर, शॉन मेंडिस आणि एड शीरन हे तीन सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत. देश काय ऐकतो आहे हे शोधून काढण्यासाठी जिओसावनने आपल्या मंचावरील जानेवारी ते सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या डेटाचे विश्लेषण करून देशातील सध्याच्या डिजिटल स्ट्रीमिंग पॅटर्न्सचा आढावा घेतला आहे